“मोदी अन् पीएम केअरमधील व्हेंटीलेटर, दोन्हीही फेल”

नवी दिल्ली – करोना संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून राज्यांना व्हेंटीलेटरसह आरोग्य साहित्य देण्यात आलं होतं. मात्र यापैकी बरेच व्हेंटीलेटर बंद आहेत. यावरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात येत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात समानता आहे. हे दोघेही केवळ खोटा प्रचार करतात. हे दोघेही आपलं काम करण्यात फेल ठरले आहे. विशेष म्हणजे दोघांनाही शोधणं कठीण आहे.


राहुल गांधींच्या या टीकेला अद्याप भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वारंवार पंतप्रधान मोदींनीवर ट्विटरवरून निशाणा साधत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.