Rashmika Mandanna – साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची (Rashmika Mandanna) फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. तसं पाहिलं तर रश्मिकाचे जितके चाहते वाढले आहेत तितकेच द्वेष करणारेही उघड्यावर आले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा एक फेक व्हिडिओ व्हायरल (Deepfake Video) करण्यात आला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे.
In regard to the deepfake AI-generated video of Rashmika Mandana, an FIR u/s 465 & 469 of the IPC, 1860 and section 66C & 66E of the IT Act, 2000 has been registered at PS Special Cell, Delhi Police and an investigation has been taken up: Delhi Police
— ANI (@ANI) November 10, 2023
तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दरम्यान, रश्मिकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांनी याबाबत संताप व्यक्त केली.
आता या प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एफआयआर नोंदवला आहे. आयपीसी, 1860 च्या 465 आणि 469 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 66C आणि 66E अंतर्गत पीएस स्पेशल सेल, दिल्ली पोलिस येथे एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.
तसेच, या प्रकणी दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटाला पत्र लिहिले आहे. ज्या अकाऊंटवरुन अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला होता त्याचे URL देण्यात यावं असं, या पत्रात लिहिलं आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलीस पुढील कारवाई काय? करणार याकडे सध्या लक्ष आहे.