Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या मागील काही दिवसांपासून डेटींगच्या चर्चा सुरू आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. मात्र दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतेही स्पष्ट माहिती दिली नाही. यातच आता रश्मिका आणि विजयचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दोघेही साखरपुडा करणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, ‘गीता गोविंदम’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विजय आणि रश्मिकाची पहिली भेट झाली होती. तसेच प्रत्येक सण दोघे एकत्र साजरा करतात. यावरून त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला.
दरम्यान, नुकतीच रश्मिका अॅनिमल या सिनेमात पाहायला मिळाली होती. यातील तिच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहे. यानंतर रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रेम्बो’ या तेलुगू सिनेमातही ती दिसणार आहे. तर विजयचा ‘खुशी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे.