Entertainment : सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवराकोंडा यांच्या अफेअरच्या चर्चा कोणत्या न कोणत्या रंगलेल्या असतात. अनेकदा त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता दिवाळीनिमित्त दोघांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रश्मिका आणि विजय दोघांनी एकत्र दिवाळी साजरी केल्याचे व्हायरल फोटोनंतर चर्चा रंगली आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. विजयने फटाके फोडतानाचे आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत, तर रश्मिकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री साडी नेसून पोज देत आहे. तर यावेळी विजयने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोस्टचे कॅप्शन सारखेच असून रश्मिकाच्या फोटोमध्ये विजयच्या घराचं बॅकग्राऊंड दिसत आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
रश्मिका आणि विजयने दिवाळीचे फोटो शेअर करतकॅप्शनमध्ये लिहिले की, Happy Diwali my loves. यासोबतच दोघांनी हार्ट इमोजी आणि स्टार पोस्ट केले. त्यांच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘मी रश्मिकाच्या पोस्टमध्ये हे कॅप्शन पाहिले आहे. दुसर्या एका चाहत्याने कमेंट केली, ‘कोणाला वाटते की ते विजयच्या घरी आहेत?’
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोघांचा असाच एक फोटो व्हायरल झाला होत. ज्या फोटोमध्ये रश्मिका एका कॅफेमध्ये बसलेली होती. तर विजय देवराकोंडा यांनी इंस्टावर काही फोटो शेअर केले होते, त्यापैकी एक या लोकेशनचा होता, जिथे रश्मिका दिसत होती.
View this post on Instagram
हे फोटो तुर्कीचे होते. जिथे विजयने कुशी चित्रपटाचे शूटिंग करत होता ज्यामध्ये त्याच्यासोबत समंथा रुथ प्रभू होती. तर रश्मिकाने शेअर केलेले फोटो सुद्धा तुर्कीचे होते. एकाच लोकेशन आणि ठिकाणचे दोघांचे फोटो असल्यामुळे चाहत्यांनी डेटिंग फोटो म्हणून या पोस्टवर कंमेंट्स केली होती. तसेच आता दिवाळीनिमित्त व्हायरल होत असलेल्या त्यांच्या या फोटोनंतरही रश्मिका आणि विजयच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.