मुंबई – कान्ये वेस्ट हे अमेरिकन म्युझिक इंडस्ट्रीतील असेच एक नाव आहे, जे नेहमीच चर्चेत असते. कान्येचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य अनेकदा चर्चेत असते. त्यांचे नाव अनेकदा वादात सापडले आहे. कान्येला कॉन्ट्रोव्हर्सी किंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच हा रॅपर पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दरवेळेप्रमाणेच या वेळीही त्याला त्याच्या चुकीची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
रॅपर कान्ये वेस्टच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारवाई करत सोशल मीडिया कंपनी मेटाने त्याच्यावर बंदी घातली आहे तसेच अकाऊंटमधील मजकूर हटवला आहे. मेटाच्या नियमांनुसार, जर एखाद्या वापरकर्त्याने वारंवार नियमांचे उल्लंघन केले तर त्याचे खाते बॅन केले जाते. कोणत्या सामग्रीवर बंदी घालण्यात आली आणि बंदी किती काळ टिकेल हे मेटाने स्पष्ट केले नाही.
कान्ये वेस्टचे इंस्टाग्राम नाव @kanyewest आहे. अलीकडेच त्याने इंस्टाग्रामवर काही मेसेजचे स्क्रीनशॉट पोस्ट केले होते, जे आता डिलीट करण्यात आले आहेत. ही पोस्ट रॅपर डिडीला पाठवली होती. या संदेशांमध्ये ज्यूंबद्दल काही चुकीच्या कमेंट करण्यात आल्या होत्या.
असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. कान्येवर यापूर्वीच इंस्टाग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. मार्चमध्ये, रॅपरला प्लॅटफॉर्मवरून 24 तासांसाठी निलंबित करण्यात आले होते. कान्ये वेस्टवर इन्स्टाग्रामवर द्वेषयुक्त भाषण, छळ आणि वर्णद्वेषी टिप्पणी पोस्ट केल्याचा आरोप होता. यानंतर वेस्टच्या खात्यातून सामग्री काढून टाकण्यात आली. आम्ही तुम्हाला सांगतो की, कान्ये वेस्टने गेल्या वर्षी त्याचे नाव बदलून ये असे ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही त्यांनी न्यायालयात सादर केली होती.