ठाणे – भारतीय जनता पक्षाचे मीरा भायंदर येथील माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर त्याच भागातील एका नगरसेविकेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार मेहता यांच्या बरोबरच त्यांचा साथीदार संजय तारक याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तथापी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दोघेही आरोपी फरारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेहता यांच्याकडून झालेल्या त्रासाची माहिती या नगरसेविकेनेच कथन केली असून त्यांची ही माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. 1999 पासून आपल्याला मेहताकडून त्रास दिला जात होता व कुटुंबियांनाही त्यांच्याकडून धमकी दिली जात होती असे सदर महिलेने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मेहता आणि तारक यांच्यावर बलात्काराचा तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.