“बैजू बावरा’साठी संजय लिला भन्साळींची पहिली पसंती रणबीर कपूरला होती. त्याच्याशिवाय कार्तिक आर्यनचेही नाव या रोलसाठी चर्चेत होते. मात्र रणबीर कपूरची निवड जवळ जवळ निश्चित मानली जात असताना त्याने या सिनेमाला नकार दिला.
View this post on Instagram
म्हणून आता रणवीर सिंह याची या सिनेमासाठी निवड झाली आहे, असे समजते आहे. रणवीर सिंहच्या नावावर आता गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते आहे.
View this post on Instagram
मात्र, अद्याप याबाबतीत काहीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. “बैजू बावरा’मध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण आणि आलिया भट लीड रोलमध्ये आहेत.
View this post on Instagram
या सिनेमामध्ये आपण काम करू शकू की नाही, याबाबत स्वतः रणबीर कपूरलाही खात्री देता येत नव्हती. याशिवाय धर्मा प्रॉडक्शनच्या आणखीन एका सिनेमाबाबतही तो थोडा कन्फ्यूज आहे. यामुळेच त्याने “बैजू बावरा’चा गांभीर्याने विचार केला नसावा.
View this post on Instagram
संजय लिला भन्साळी सध्या “हिरा मंडी’ या वेब सीरिजचे कास्टिंग फायनल करण्यात बिझी आहेत. “हिरा मंडी’साठी भन्साळींनी हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांना यापूर्वीच निश्चित केले आहे.