हरियाणाची डान्सर सपना चौधरी आज देशभरात ओळखली जाते. रियॅलिटी शो “बिग बॉस’मध्ये झळकल्यानंतर तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. मनोरंजन क्षेत्रात तब्बल 15 वर्षे काम केल्यानंतरही सपना चौधरीला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळविण्यासाठी स्ट्रगल करावे लागत आहे.
View this post on Instagram
एका मुलाखतीत सपना चौधरीने आपल्यासोबत भेदभाव होत असल्याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली, या वर्षी मला इंडस्ट्रीत 15 वर्षे पूर्ण झाले आहेत. मी हिंदी चित्रपटात आणि टीव्ही शोमध्ये काम करू इच्छित आहे. परंतु मला असे वाटते की, मी रिजनल इंडस्ट्रीतून (हरियाणा) असल्याने मला स्वतःचे टॅलेंट दाखविण्यासाठी संधी दिली जात नाही.
View this post on Instagram
सपना चौधरी म्हणाली, मी स्किन रिव्हिलिंग कपडे घालू इच्छित नाही आणि मला फर्राटेदार इंग्रजी बोलता न येणे, ही माझी सर्वांत मोठी अडचण आहे. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत मला कोणीही गॉड फादर नसल्याने इतकी वर्षे काम करूनही हिंदी इंडस्ट्रीत एक ब्रेक मिळविण्यासाठी स्ट्रगल करावा लागत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सपना चौधरीने भोजपुरी, हरियाणवी, पंजाबी गाण्यांसह बॉलीवूडमध्ये आपल्या डान्सिंग अदांनी देशभरात फॅनफॉलोइंग तयार केली आहे. ती सतत विविध टीव्ही शोमध्येही काम करत असते. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्येही आयटम सॉंग केले आहेत.