’83’चित्रपटाच्या सेटवर रणवीर झाला भावूक…

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त रणवीरने त्याचा आगामी चित्रपट ’83’मधील फर्स्ट लूक शेअर केला होता. रणवीरचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याला कपील देव यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते. यातच रणवीरनेच त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे सध्या रणवीर ’83′ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.


या चित्रपटातील शूटिंग दरम्यानचे खास किस्स्यांचे अपडेट तो नेहमीच आपल्या सोसिअल मीडिया अकाउंटवर शेअर करीत असतो. अलीकडेच त्याने वाढदिवसा निमित्य या चित्रपटातील फर्स्ट लुक शेअर करीत लिहिले होते की,’माझ्या आयुष्यातील खास दिनानिमित्त, तुमच्यासाठी कपिल देव यांच्या भूमिकेतील माझा लूक’ असे कॅप्शन दिले होते. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातच इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने या चित्रपटाचे शूटिंग करतांनाचे भावनिकी क्षणबाबत दिल खुलास चर्चा केली आहे.

रणवीर म्हणाला की,’मी कुठलाही चित्रपट करतांना त्या चित्रपटातील मी प्ले करणाऱ्या कैरेक्टरमध्ये पूर्णपणे स्वतःला मोडण्याचा प्रयत्न करीत असतो. या चित्रपटात सुद्धा मी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काही क्षण असे होते ज्यामुळे मी भावनिक होऊन माझ्या डोळ्यातीळ अश्रू अनावर झाले.’

 

View this post on Instagram

 

36 years ago on this day, India turned the world upside down!!! 🇮🇳🏏🏆💫 #ThisIs83 @83thefilm @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


दरम्यान, या फोटोमध्ये रणवीर हुबेहुब कपिल देव यांच्या सारखा दिसत आहे.कबीर खान निर्मित “83′ हा चित्रपट 1983 साली झालेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित असून ही विश्‍वचषक स्पर्धा अनपेक्षीतरित्या भारताने जिंकली होती. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारत आहे. यात तो माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)