बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने म्हटले आहे की, त्याने दीपिका पादुकोनला लग्नापूर्वी एक वादा केला होता तो आजपर्यंत पूर्ण केलेला नाही.
रणवीरने इंस्टाग्रामवर याविषयी म्हटले आहे. त्याने म्हटले की, “दीपिका आणि तिच्या कुटुंबातील लोकांना इम्प्रेस करण्यासाठी खूप बढाया मारत होता की, मला खूपच स्वादिष्ट बटर चिकन बनवता येते. मी यूएसमध्ये युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होतो तेव्हा पूर्ण शहरामधून सर्वांत स्वादिष्ट बटर चिकन मीच बनवत होतो.
भारतच नाही तर पाकिस्तान आणि बांगलादेशचे लोक चिकन खाण्यासाठी माझ्या दरवाजापाशी येऊन थांबत होते’. रणवीरने दीपिका आणि तिच्या कुटुंबाला आपल्या हातून बनविलेले चिकन खाण्याचा वादा केला होता तो त्याने पूर्ण केला नाही.