वडूज – कॉंग्रेसच्या माध्यमातून आणि जनआंदोलनाद्वारे चळवळ उभी करणाऱ्या त्याचबरोबर दुष्काळी भागात दोन यशस्वी सूतगिरण्या उभारणाऱ्या व येथील जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झगडणाऱ्या देशमुख यांना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी ताकद देणार असल्याचे सुतोवाच प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी बुधवारी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात स्वगृही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार भाई जगताप, राज्यप्रवक्ते सचिन सावंत, उदयसिंह पाटील उडांळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव गोडसे, राजेंद्र शेलार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काही तांत्रिक व भौगोलिक कारणांमुळे रणजितसिंह देशमुख यांच्यावर अन्याय झाला, हे आपण मान्य करतो. यापुढे जनतेच्या विकासासाठी झगडणाऱ्या देशमुख यांना माण-खटाव मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी मदत करणार आहे.
कॉंग्रेस प्रवेशानंतर रणजितसिंह देशमुख म्हणाले, पुन्हा कुटुंबात आल्याने नवी उमेद, नवी जबाबदारी स्विकारून माढा लोकसभा व माण विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात उदयसिंह पाटील उडांळकर यांच्याबरोबर राहून राज्यातील वरिष्ठ नेते व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गतवैभव प्राप्त करून देण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी मानले. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, खटाव तालुकाघ्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी नगराघ्यक्ष डॉ. महेश गुरव, माण तालुकाध्य एम. के. भोसले, बाबूराव शिंदे, मानाजी घाडगे, ऍड. संतोष पवार, सचिन घाडगे, प्रकाश मोहिते, संजयशेठ शितोळे, श्रीरंग देवकर, हणमंत भोसले, विनायक जगदाळे, सत्यवान कांबळे, विकास साबळे, राजूभाई मुलाणी, शरद बागल, विश्वंभर बाबर, बाबासाहेब माने, शिवाजी यादव,घर्मराज जगदाळे, संजय पाटील, सदाशिव खाडे, परेश जाधव, पोपट मोरे,विजय शिंदे.आदीसह खटाव माण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती होती. यावेळी गुरसाळ्याचे डॉ. बाळासाहेब झेंडे, माजी पचायंत समिती सदस्य भरत जाधव, संजीव साळुंखे, निलेश जाधव, दत्ता कदम, आदींसह माण खटाव तालुक्यातील प्रमुख शेकडो कार्यकर्त्यनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.