रणबीर कपूरचा ‘संजू’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्याच्या हाती अनेक मोठे प्रोजेक्ट आले आहेत. रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटातील लूकसाठी रणबीर अथक परिश्रम घेत आहे. यातीलच शमशेरा चित्रपटातील रणबीरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये त्याला ओळखणेही कठीण आहे.
#SHAMSHERA #RanbirKapoor
????? #SHAMSHERA Will Be Sure Shot Super Duper Hit ?????? pic.twitter.com/qyIkst5A0N— ? (@Bunrkholic) October 10, 2019
शमशेरा चित्रपटात रणबीर कपूरचा लूक खूपच वेगळा आहे. या चित्रपटात रणबीर पहिल्यांदाच डबल रोल साकारणार आहे. या सिनेमात तो एका डाकूची भूमिका साकारणार असून रणबीर वडील आणि मुलगा अशा भूमिका स्वत:च साकारत आहे.
या चित्रपटात रणबीर कपूरसोबत संजय दत्त, वाणी कपूर आणि रोनीत रॉयही असणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनांची जबाबदारी करण मल्होत्रा पार पाडणार आहे. याआधी करण मल्होत्रा यांनी अग्निपथ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.
शमशेरा या चित्रपटाची कथा ब्रिटिशाचे राज्य असतानाची आहे. यामध्ये एक डाकू कशाप्रकारे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतो आणि आपल्या हक्कासाठी लढतो हे दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ३१ जुलै रोजी प्रदर्शित होईल.