मुंबई – रणबीर कपूरचे “ब्रह्मास्त्र’ आणि “शमशेरा’ हे दोन बिग बजेट सिनेमे बऱ्याच काळापासून अडकले आहेत. पहिल्यांदा पोस्ट प्रोडक्शनच्या कामामुळे आणि आता करोनाच्या साथीमुळे हे दोन्ही सिनेमे अजून रिलीज झालेले नाहीत. त्यामुळे आता बीएफएक्स न कराव्या लागणाऱ्या सिनेमात काम करायचे रणबीरने ठरवले आहे.
आता त्याला पुन्हाएकदा राजकुमार हिरानीच्या सिनेमामध्ये काम करायची संधी मिळाली आहे. यापूर्वी त्याने “पिके’ आणि ‘संज’ू सारख्या सुपरहिट सिनेमातून हिरानी बरोबर काम केले होते. सध्या राजू हिरानी शाहरुखच्या एका सिनेमावर काम करत आहे.
हा सिनेमा संपल्यावर लगेचच राजू हिरानी रणबीर कपूरच्या सिनेमाची अनाउन्समेंट करणार आहे. आतापर्यंत समजलेल्या माहितीनुसार हा एक बिग बजेट सिनेमा असेल आणि त्याचे बजेट 300 कोटी रुपये असेल.