आजचे भविष्य (शुक्रवार, दि. १५ जानेवारी २०२१)

मेष : जे होते ते चांगल्यासाठीच होते ही तुमची धारणा असते. त्यामुळे प्रगतीला पूरक मानसिकता राहील.

वृषभ : व्यवसायात बाजारातील घडामोडींनुसार कामाच्या पद्धतीत बदल कराल. घरात तरुणांचे विवाह जमतील.

मिथुन : कामातील अडथळे दूर झाल्याने कामे मार्गी लागतील. अधिकाराचा वापर योग्य वेळी करावा लागेल.

कर्क : सुवार्ता कळेल. नोकरीत कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे करुन घ्यावी लागतील.

सिंह : महिलांना आवडत्या छंदात वेळ रमविता येईल. अंगी असणारे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

कन्या : पूर्वीच्या ओळखीचा उपयोग होईल. व्यवसायात योग्य व्यक्तिंची मदत घेऊन कामे पूर्ण करता येतील.

तूळ : नवीन योजना कार्यान्वित होतील. पैशाची आवक वाढेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल.

वृश्‍चिक :  नोकरीत आवडीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. चांगल्या कामामुळे एखादे पद वरिष्ठ तुम्हाला देतील.

धनु : घरात तुमच्या व्यक्तिगत जीवनातील महत्वाकांक्षा सफल होईल. त्यामुळे आनंद मिळेल.

मकर : गृहसौख्य उपभोगता आल्याने शांतता लाभेल. सकारात्मक दृष्टी ठेवून कामांकडे बघाल.

कुंभ :  जी कामे रेंगाळलेली होती त्यास गती येईल. महत्वाच्या कामांना प्राधान्य राहील.

मीन : व्यवसायात नवीन योजना करुन विक्री व भांडवल वाढवण्याचा प्रयत्न राहील. प्रकृतीमान सुधारेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.