Ramdev BaBa : रामदेवबाबा यांच्याविरोधात छत्तीसगढमध्ये गुन्हा दाखल

रायपूर – योगगुरू रामदेवबाबा यांच्या विरोधात छत्तीसगढ पोलिसांनी ऍलोपथीविषयी खोटी माहिती पसरवत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. त्यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) छत्तीसगढ शाखेने तक्रार नोंदवली होती.

रामदेवबाबांचे काही व्हिडिओ मागील काळात सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाले. त्यामध्ये ते ऍलोपथीविषयी प्रतिकूल टिप्पणी करताना आढळले. त्यावरून देशभरातील डॉक्‍टरांमध्ये नाराजी पसरली. त्यातून काही काळ रामदेवबाबा विरुद्ध आयएम असे चित्र निर्माण झाले.

नंतर रामदेवबाबांनी सौम्य भूमिका स्वीकारत ऍलोपथीची प्रशंसा केली. तसेच, चांगल्या डॉक्‍टरांचा उल्लेख पृथ्वीवरील देवदूत म्हणून केला. मात्र, आयएमएच्या तक्रारीवरून छत्तीसगढमध्ये गुन्हा दाखल झाल्याने ते प्रकरण अद्याप संपले नसल्याचे मानले जात आहे. आयएमए ही देशातील डॉक्‍टरांची प्रमुख संघटना आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.