मेष : कामातील बेत गुप्त ठेवा. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. डोके शांत ठेवा.
वृषभ : घरात जुन्या प्रश्नावर व वादांवर तोडगा निघेल. महिलांना दिलासा देणारी घटना घडेल.
मिथुन : तरुणांना थोडेसे संभ्रमात टाकणारे ग्रहमान आहे तरी मनाला योग्य वाटेल तसेच वागा व निर्णय घ्या.
कर्क : योग्य मार्ग मिळवण्यासाठी थोडे सबुरीचे धोरण ठेवा. कामांमुळे जुने हितसंबंध संपण्याची शक्यता आहे.
सिंह : पैशांची आवक चांगली असेल. नोकरीत हातातील कामात बिनचूक राहा. नवीन कामे मिळतील.
कन्या : चिडचिड न करता झेपेल तेवढेच काम करा. पेल्यातील वादळे उठतील व पेल्यातच विरतील.
तूळ : प्रियजन, नातेवाइकांच्या भेटीचे योग येतील. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या.
वृश्चिक : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कामे स्वीकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा.
धनू : अपेक्षित पत्रे हाती येतील. बौद्धिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.
मकर : प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मूड लागेल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल.
कुंभ : आर्थिक बाबतीत तुम्ही अत्यंत दक्ष असता तेव्हा कामाचे योग्य नियोजन करून उलाढाल वाढवाल.
मीन : व्यवसायात जुनी येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित कराल. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल.