दावडी (वार्ताहर) – यंदा इतिहासात प्रथमच दावडी (ता. खेड) परिसरतील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदनिमित्त नमाज पठण घरी केले. व करोनाचे सावट लवकरात लवकर दूर होऊ दे, अशी प्रार्थना केली.
पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लीम बांधवांनी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून व संयम पाळून सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले. कोणतीही गर्दी होणार नाही असे कार्यक्रम टाळून मुस्लीम बांधवांनी तराविहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदि धार्मिक विधी घरीच केले. अद्यापही करोनाचे संकट संपले नसल्याने तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने रमजान ईदची नमाज ही घरीच पठण करण्यात आले.
गर्दी न करता व प्रत्यक्ष गाठीभेटी न घेता मोबाइलवरूनच नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना शुभेच्छा द्याव्यात, असे दावडी मुस्लीम समाज ट्रस्ट, पोलीस पाटील व ग्रामपंचायत दावडीच्या वतीने आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार समाजबांधवांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दावडी बीटचे पोलीस अंमलदार घोडे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, युवा नेते हारूण शेख, अल्ताब इनामदार, राजू मुलाणी व मौलाना शहादत शेख उपस्थित होते.