राम शिंदेंची नाराजी उघड; पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटलांना लगावला टोला

मुंबई: विधानपरिषद उमेदवारीवरुन भाजपमधील नाराजी नाट्य काही संपायचं नाव घेत नाही. याआधी एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली होती. आता माजी मंत्री राम शिंदे यांनीही आपली नाराजी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये राम शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.

राम शिंदे म्हणाले, विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी “विधानपरिषदेसाठी नेते, इच्छूक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील.” असे म्हटले होते.
त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास (त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला. जो मला आणि इतरांना जमला नाही..!

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.