राखी सावंतने दिली दीपक कलालला धमकी

ड्रामा क्‍वीन राखी सावंत वेगवेगळ्या वादातून मुक्त होत नाही. सध्या दीपक कलाल याच्यासह तिचे नवीन नाटक सुरू झाले आहे. रितेश एच नावाच्य “एनआरआय’बरोबर तिचे लग्न झाल्याची बातमी नुकतीच पसरली होती. त्यापूर्वी दीपक कलालबरोबर तिचे लग्न ठरले होते. दीपकने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यात तो म्हणतो, मला रितेश एच माहित आहे. मला तुमच्या आयुष्याशी काही देणेघेणे नाही, परंतु तुमची मोठी स्वप्ने साकार होणार नाहीत. 12 मुलांची क्रिकेट टीम बनवण्याचे स्वप्न रितेशबरोबर पूर्ण होणार नाही. तू रितेशला सोड, असे दीपकने म्हटले आहे. त्याने राखीला चार कोटी रुपये परत मागितले आणि तिच्या नवऱ्यावर अश्‍लील टिप्पणी केली होती. यावर राखी खूप चिडली.

दीपकचा हा व्हिडिओ राखीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि दीपकला शिव्या देण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले. राखी म्हणाली, तुम्ही माझ्या कालीला दुर्गेचे स्वरूप देऊ नका. दुर्गेप्रमाणे मी तुला त्रिशूलाने ठार करीन. आता तुम्ही पाहा, मी तुझा बॅंड वाजवते की नाही.2018 मध्ये राखी सावंतने दीपक कलालशी लग्न करण्याची घोषणा केली होती. पण, नंतर त्यांनी स्वतः यास पब्लिसिटी स्टंट म्हटले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)