राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. राखीची आई जया सावंत गेल्या अनेक दिवसांपासून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी त्या झुंड देत होत्या. अखेर त्यांची आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. राखीचा पती आदिल खान दुर्रानी यांनी जया सावंत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अनेक दिवसांपासून राखी सावंत तिच्या आईला रुग्णालयात भेटायला जाताना दिसत होती. तिच्या आईच्या प्रकृतीसाठी चाहते सतत प्रार्थना करत होते. राखीही तिच्या चाहत्यांना आई लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होती. पण 28 जानेवारी राखीसाठी दुःखाचा दिवस ठरला. राखीवर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा राखी सावंत मराठी बिग बॉसमधून बाहेर पडली तेव्हा तिला तिच्या आईची अवस्था कळली. ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि थेट हॉस्पिटलमध्ये गेली. रुग्णालयातून राखी सावंतने लाईव्ह सेशन करून चाहत्यांना आईच्या तब्येतीची माहिती दिली. रडत रडत तिने सांगितले की तिच्या आईला कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमर झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.