अलीगढ – प्रजासत्ताक दिनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात नारा-ए-तकबीर “अल्लाहू अकबर’चा नारा दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आहे. दरम्यान, डॅमेज कंट्रोल’चा एक भाग म्हणून विद्यापीठ प्रशासनाने आरोपी विद्यार्थ्याला निलंबित केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे.
इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यात 7 ठार; पोलिसांनी दिली माहिती
पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला, बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट वाहिद उज्मा याने प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सहकारी कॅडेट्समध्ये एएमयु जिंदाबाद, नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, इतर अनेक कॅडेट्सनीही उत्साहात घोषणाबाजी केली. एनसीसी कॅडेटचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्याने आरोपी विद्यार्थ्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.
आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा यांना लंडनमध्ये पुरस्कार
उज्मा घोषणा देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि भाजप नेते डॉ. निशित शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून हा व्हिडिओ ट्विट केला असून अलीगड पोलिस आणि एसएसपी कलानिधी नैथानी यांना टॅग केले आहे. त्यानंतर लगेचच यंत्रणा कार्यान्वित झाली. विद्यापीठाचे प्रॉक्टर मोहम्मद वसीम अली यांनी सांगितले की, वहीद उजमा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे, याला घोषणाबाजी केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.