मुंबई – राज्यसभा निवडणूक आता केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे त्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मनसेकडे एक मत आहे. त्यामुळे हे मत मिळवण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
चर्चेत काय अंतिम निर्णय झाला ते मात्र मनसेकडून अद्याप जाहीर झालेले नाही. विधानसभेत राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यांनी आपण राज ठाकरे ठरवतील त्याप्रमाणे मतदानाचा निर्णय घेऊ असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले की, आम्ही त्यांचे एक मत भाजपला मिळावे अशी त्यांना विनंती केली. आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला असून त्या पक्षाचे एक मत आम्हालाच मिळेल असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.