चंद्रशेखरने तिघांच्या हत्या करून आत्महत्या केल्याचे उघड

अमेरिकेतील एकाच कुटुबांतील हत्या प्रकरणाचा झाला उलगडा

वॉशिंग्टन – अमेरिका स्थित भारतीय आयटी तंत्रज्ञ चंद्रशेखर सुंकारा यांच्या कुटुंबातील चारही जण घरात संशयास्पद मृतावस्थेत सापडले होते. त्यांच्या अंगावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा असल्याने त्यांची हत्या झाली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत होता. तथापि या प्रकरणात करण्यात आलेल्या चौकशीनंतर चंद्रशेखर यांनीच आपली पत्नी व दोन लहान मुलांची हत्या करून नंतर स्वत:ही आमहत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील चंद्रशेखर हे 44 वर्षीय असून त्यांच्या पत्नी लावण्या या 41 वर्षांच्या व मुले 14 आणि 11 वर्षांची आहेत.

काल त्यांचे मृतदेह आढळून आल्याने या भागातील भारतीय नागरीकांमध्ये तसेच अन्य स्थनिकांमध्येही मोठीच खळबळ माजली होती. मात्र चंद्रशेखर यांनी आपल्या कुटुंबियांची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा निष्कर्ष; पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आणि परिस्थतीजन्य पुराव्यावरून काढला आहे. मात्र या प्रकरणातील अन्य प्रश्‍नांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करीत आहेत. या हत्या आणि आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र अजून समजलेले नाही. चंद्रशेखर यांना गेल्या एप्रिल महिन्यातच शस्त्र परवाना मिळाला होता. त्यांना साडे दहा लाख डॉलर्स वार्षिक पगार होता. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. हे कुटुंब मुळचे आंध्रप्रदेशातील आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×