अमेरिकेने घुसखोरांना हाकलण्यासाठी सुरू केली प्रक्रिया

वॉशिंग्टन – अमेरिकेने त्यांच्या देशात घुसलेल्या लक्षावधी बेकायदेशीर घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावले जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की या प्रक्रियेसाठी आम्ही सुरक्षीत थर्ड कंट्री डील ग्वाटेमालाशी केले आहे. त्यामुळे या घुसखोरांना बाहेर हाकलल्यानंतर त्यांना तातडीने दुसऱ्या देशात आश्रय घेण्याची सोय झाली आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे घुसखोर जितक्‍या वेगाने आमच्या देशात आले तितक्‍याच वेगाने त्यांना पुढील आठवड्यापासून देशाबाहेर हाकलले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

या घुसखोरांनी ग्वाटेमालात प्रवेश केला तर त्यांना तेथे निराश्रीतांचा दर्जा दिला जाणार आहे त्यासाठी ग्वाटेमालाने तयारी दर्शवली आहे. यातील बहुतेक घुसखोर हे ग्वाटेमाला, अलसाल्वाडोर, आणि हुंडुरास या देशांतील आहेत. या देशातील नागरीक पुन्हा अमेरिकेच्या हद्दीत घुसुनयेत म्हणून प्रभावी उपाययोजण्यास त्या देशांना सांगण्यात आले आहे.

मेक्‍सिकोतूनही मोठ्या प्रमाणात घुसखोर अमेरिकेच्या हद्दीत येतात. त्यांना रोखण्यासाठी मेक्‍सिकोने त्यांच्या सीमावर्ती भागात सहा हजार गार्ड तैनात करण्याचा निर्णय अमेरिकेच्या पुढाकाराने घेतला आहे. मेक्‍सिकोने ही घुसखोरी रोखण्यासाठी केलेल्या उपायोजनांबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचे जाहीर कौतुकही केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.