राज्यसभा निवडणूक – कॉंग्रेसच्या याचिकेवर आज सुनावणी

नवी दिल्ली – राज्यसभेच्या गुजरात मधील रिक्त होणाऱ्या दोन जागांवर दोन वेळा स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर उद्या बुधवारी सुनावणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

अमित शहा आणि स्मृती इराणी हे दोन सदस्य गुजरात मधून राज्यसभेवर गेले आहेत. परंतु आता ते दोघेही लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा भरण्यासाठी गुजरातेत पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. मात्र भाजपला अनुकुल स्थिती होण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन सदस्यांसाठी दोन स्वतंत्र वेळा पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

या दोन्ही जागांसाठी एका वेळीच पोटनिवडणूक घेतली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करून घेतली आहे. या दोन जागांसाठी एकाच वेळी निवडणूक घेतली गेली तर तेथील एक जागा कॉंग्रेसला िंजंकणे सोपे जाणार आहे. पण निवडणूक आयोगाने ही स्थिती टाळण्यासाठी दोन जागांसाठी दोन वेळा निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. गुजरात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते परेसभाई धनानी यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.