राजवीर पियू ला देणार प्रेमाची कबुली !

राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे. पियू आपणच विरोधी पक्षातल्या अंकुशराव पाटलाची मुलगी आहोत ही तिची खरी ओळख वीरु पासून दडवून ठेवली होती.

पियूकडून घडलेल्या एका नकळत कृतीपायी राजवीर अडचणीत आला होता त्यामुळे राजवीर आणि पियू मध्ये खटके उडत होते, पण आता त्यांची मैत्री झालेय, वीरू ला पियूच्या वागण्याबोलण्यातून तिला तो आवडत असल्याचं वाटतं.

वीरू पियुला प्रपोज करायचं ठरवतो खूप प्रयत्नांती तो प्रियांका ला प्रपोज करतो. आता ह्यावर पियूचं उत्तर काय असेल, ती सुद्धा या प्रेमाला होकार देईल की आपले वडील अंकुशराव पाटील ह्यांना घाबरून राजवीर ला कायमचं विसरेल या उत्तरांसाठी पाहत राहा “कारभारी लयभारी” सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. आपल्या झी मराठीवर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.