#Budget2019 : अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची नाराजी, म्हणाले…

कोल्हापूर – केंद्रीय अर्थसंकल्पावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या तरतुदी केलेल्या नाहीत.

खरतर शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर अशा तरतुदी करणे गरजेचे होत. परंतु शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या फायद्याच्या तरतुदी न केल्यामुळे राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शेतीविषयक आर्थिक धोरणांमध्ये वृद्धी होण्याऐवजी त्यात घट झाल्यानं शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. पण तसे काहीच या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.