सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांसह राजनाथ सिंह यांची चर्चा

नवी दिल्ली – भारत आणि सिंगापूर दरम्यान संरक्षण मंत्र्यांचा 5 वा संवाद बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला. गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय सहकार्य आणि संरक्षण भागीदारीत भरीव वाढ होत आहे. 

भारत आणि सिंगापूर यांच्यात संरक्षण आणि सुरक्षा गुंतवणूकीने सशस्त्र सैन्याच्या तीनही सेवा तसेच संरक्षण तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात व्यापक प्रमाणात आणि कार्यक्षेत्रात विस्तृतपणे वाढ झाली आहे. दोन्ही नौदलातील पाणबुडी बचाव, मदत आणि सहकार्य याविषयीच्या अंमलबजावणी करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल दोन्ही मंत्र्यांनी या संवादात आनंद व्यक्त केला. 

नोव्हेंबर 2020 मध्ये आयोजित भारतीय नौदल आणि सिंगापूर नौदलाने सिंगापूर-भारत सागरी द्विपक्षीय प्रात्यक्षिकाची 27 वी फेरी पार पाडली होती. तसेच सिंगापूर-भारत-थायलंड सागरी प्रात्यक्षिकाच्या दुसऱ्या फेरीत भाग घेतला होता.

दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यात द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक वृद्धिंगत करण्याविषयी कटिबद्धता व्यक्त केली असून या प्रदेशात कायमस्वरुपी शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी बहुपक्षीय उपक्रमांना पाठिंबा दर्शविला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.