बॉलीवूडमधील अभिनेता राजकुमार राव याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजकुमारने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तेलुगू भाषेतील थ्रिलर असलेल्या “हिट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये राजकुमार रावची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. “हिट’ चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश कोलानू यांनी केले होते, तर हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहे. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन स्टेजवर असून पुढील वर्षापर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
राजकुमार राव याच्या या चित्रपटाची निर्मिती दिल राजू आणि कुलदीप राठोड करत आहेत. “हिट’ हा दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटांपैकी एक असून आता त्याचा हिंदी रिमेकही प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षा आहे. राजकुमार राव याच्यासह या चित्रपटात अभिनेत्री कोण असेल याची अद्याप घोषणा झालेली नाही.
दरम्यान, राजकुमार राव याच्याकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. “लुडो’ व्यतिरिक्त तो “रुही-अफजा’ आणि “छलांग’ चित्रपटांमध्येही दिसणार आहे. जान्हवी कपूर ‘रुही-अफ्झा’ चित्रपटात राजकुमार राव सोबत दिसणार आहे. ‘लुडो’मध्ये अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फातिमा सना शेख, आदित्य राय कपूरदेखील दिसणार आहेत.