बंदीपूर अभयारण्यात चित्रिकरणासाठी दाखल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ मेगास्टार रजनिकांत हे बेअर ग्रिल यांच्यासमवेत मॅन व्हर्सेस वाईल्ड या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सहभागी होणार आहेत. दरम्यान, रजनीकांत आणि ग्रिल हे दोघे बंदीपूर अभयारण्यात सकाळी दाखल झाले होते.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, बंदीपूर अभयारण्यात ते या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रील्ससोबत रजनीकांत शूटिंग करत असताना दुर्घटना घडली आणि किरकोळ दुखापत झाली.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यानंतर आता सुपरस्टार थलाईवा रजनीकांत ‘मॅन वर्सेस वाईल्ड’मध्ये दिसणार आहेत. ब्रिटनचा प्रसिद्ध साहसवीर बेअर ग्रील्ससोबत ते शूटिंग करत होते. तेव्हा त्यांना दुखापत झाली. या कार्यक्रमाचं शूटिंग कर्नाटकच्या प्रसिद्ध बांदिपूर जंगलात सुरु आहे. हे जंगल वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे.या कार्यक्रमासाठी कर्नाटक वन विभागाने चित्रीकरणासाठी परवानगी दिली. त्यानंतर या कार्यक्रमाचं शूटिंग सुरु करण्यात आलं. हे शूटिंग तीन दिवस चालणार आहे.