बंदीपूर अभयारण्यात चित्रिकरणासाठी दाखल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ मेगास्टार रजनिकांत हे बेअर ग्रिल यांच्यासमवेत मॅन व्हर्सेस वाईल्ड या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सहभागी होणार आहेत. दरम्यान, रजनीकांत आणि ग्रिल हे दोघे बंदीपूर अभयारण्यात सकाळी दाखल झाले.
After Prime Minister Narendra Modi, Rajinikanth will be shooting an episode of Man vs Wild with Bear Grylls at Bandipur forest in Karnataka. Here are the visuals of the Tamil actor in Bandipur. @TheQuint pic.twitter.com/wuuZHrGdgv
— Arun Dev (@ArunDev1) January 28, 2020
ग्रिल यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी गेल्यावर्षी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण 12 ऑगस्ट रोजी झाले होते. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात दिसताच ट्विटरवर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात मोदी यांनी 530 किमी पसरलेल्या जंगलात ट्रेक केला होता. या जंगलात मगरी आणि हत्तींचा वावर आहे. वाघही विपूल प्रमाणात आहेत. ज्यावेळी ग्रिल म्हणाले, आपण अत्यंत धोकादायक ट्रेकचा अनुभव घेत आहोत त्यावेळी, मोदी उत्तरले होते, जर आपण निसर्गाविरूध्द जाणार असू तरच धोक्याचा अनुभव येईल.