नवी दिल्ली : टोकिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य असून या पदकासह देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नही मिळविणार असल्याचा निर्धार भारताची अव्वल मुष्टीयुध्दपटू व सुपरमाॅम मेरी कोम हिने व्यक्त केला आहे.
After Padma Vibhushan, boxer Mary Kom dreams of winning Bharat Ratna. #MaryKom #PadmaAwards
— Press Trust of India (@PTI_News) January 26, 2020
सहा वेळा जागतिक विजेती असलेल्या मेरी कोमला प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तिने ही प्रतिक्रिया दिली. हा पुरस्कार मिळवणारी मेरी कोम भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
Dear Mary Kom @MangteC , Hearty Congratulations on being conferred with the most prestigious Padma Vibhushan! What you have achieved for India in sports is beyond any words! You won 8 World Boxing Championship medals and an Olympic medal! Whole of India is proud of you. pic.twitter.com/2hZjOcV3RG
— Kiren Rijiju (मोदी का परिवार) (@KirenRijiju) January 25, 2020
देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळवणे हेच माझे स्वप्न आहे.पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने मला भारतरत्न हा पुरस्कार देखील मिळविण्याची प्रेरणा मिळाली, असेही मेरी कोमने सांगितले.