‘रजनीकांत’ यांना इतक्यात डिस्चार्ज नाहीच, डॉक्टर म्हणाले…

रजनीकांत लवकर बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली

मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ (rajinikanth) यांची प्रकृती अचानक खालावल्याने शुक्रवारी (दि. २५) त्यांना हैद्राबातमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये असं दिसून आलं आहे की, त्यांचा रक्तदाबाचा अजूनही नियंत्रणात आलेलं नाही. त्यामुळे आजही रजनीकांत यांना डिस्चार्ज देतील की नाही याबाबत शाश्वती नाही. रजनीकांत यांना उच्च रक्तादाबाशिवाय इतर कोणता ही त्रास नसल्याचे ही काल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. 

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांच्या मोठा चाहता वर्ग असून, रजनीकांत लवकर बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आगामी अन्नाथे (Annaatthe) चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री नयनतारा आणि रजनीकांत हे हैदराबादमध्ये होते. त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.