ब्रिटनहून आलेल्या 342 जणांचे होणार ‘जिनोम टॅपिंग’

स्वखर्चाने “आरटी-पीसीआर’ चाचणी करावी लागणार


करोनाच्या नव्या प्रकारामुळे महापालिकेचा निर्णय

पुणे – ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या तीन आठवड्यांत युरोप आणि मध्य पूर्व आशियातून शहरात आलेल्या 542 नागरिकांना घरातच विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातील 342 जण पुण्यातील आहेत, या सगळ्यांचीच “जिनोम टॅपिंग’ अर्थात विषाणूच्या जनुकीय रचनेच्या अभ्यासाद्वारे चाचणी होणार असल्याचे महापालिकेतील सह आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

या 342 जणांना स्वखर्चाने “आरटी-पीसीआर’ चाचणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही महापालिकेने दिले आहेत. महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये आढळलेल्या या करोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार होऊन नये, यासाठी राज्य सरकारने युरोपीय आणि मध्य-पूर्व आशियातील देशांसोबतचा विमान प्रवास बंद केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही तातडीने पावले उचलून गेल्या तीन आठवड्यांमध्ये या देशांमधून आलेल्या प्रवाशांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले आहे.

“गेल्या तीन आठवड्यांत यूरोप आणि मध्य-पूर्व आशियातून आलेल्या 542 प्रवाशांची यादी करण्यात आली आहे. त्यातील पुण्यातील जे 342 जे नागरिक आहेत त्यातील दोन-तीन आठवड्यांपूर्वी आलेल्या प्रवाशांना कोणतीही लक्षणे नसल्याने, त्यांची चाचणी करणे संयुक्तिक ठरणार नाही.

मात्र, गेल्या आठवड्यात शहरात परतले आहेत, त्यांनी लक्षणे असो वा नसो, स्वखर्चाने “आरटी-पीसीआर’ चाचणी करून त्याचा अहवाल दोन-तीन दिवसांत महापालिकेकडे सादर करणे बंधनकारक केले आहे. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील, त्यांना नायडू रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.