राजगुरूनगर: श्री प्रथमेश ज्वेलर्स यांच्या वजनदार जोडी ऑफरला “श्री व सौं’ची पसंती

राजगुरूनगर – येथील श्री प्रथमेश ज्वेलर्स प्रा. लिमिटेडमध्ये दसरा, दिवाळी निमित्ताने सुरू केलेल्या “वजनदार जोडी’ ऑफरमध्ये सोने-चांदीचे दागिने खरेदीला ग्राहकांनी पसंती देत खरेदीसाठी गर्दी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांची सोने चांदी विक्रीची परंपरा आणि ग्राहकांची विश्‍वसनीय ठिकाण राजगुरूनगर येथील श्री प्रथमेश ज्वेलर्स असून यावर्षी दिवाळीच्या अगोदर “वजनदार जोडी’ ऑफरमध्ये सोने खरेदी करून ग्राहकांनी दसरा साजरा केला. श्री प्रथमेश ज्वेलर्समध्ये विविध वजनातील दागिने ठेवण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील विविध भागातील ग्राहक येथे खरेदीसाठी येत आहेत. ग्राहकांना संधी आणि फायदा होण्यासाठी प्रथमेश ज्वेलर्सकडून वर्षानुवर्षे विविध ऑफर दिल्या जात आहेत. यावेळीही या आगळ्या वेगळ्या ऑफरचा ग्राहकांना मोठा फायदा होत असल्याने त्यांनी सोने खरेदीला गर्दी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवित असल्याने यावर्षी “वजनदार जोडी’ ऑफर खास ग्राहकांसाठी आणली आहे. करोनाचे संकट असूनही सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी ही ऑफर दि. 21 ऑक्‍टोबर ते 21 नोव्हेंबर 2020 या काळासाठी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे ग्राहकांमधून सर्वत्र कौतुक होत आहे.

दिवाळीच्या सणानिमित्ताने सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना श्रीप्रथमेश ज्वेलर्समध्ये टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरीसह नववधू अलंकार व दागिने विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोन्याचे दर वाढूनही ग्राहकांची सोने खरेदी सुरू आहे.

लग्नसराई, वधू-वरांचे दागिने खरेदी करण्यासाठी राजगुरूनगर येथील श्री प्रथमेश ज्वेलर्सला ग्राहकांची मोठी पसंती असते. जिल्ह्यातील विविध भागातील नागरिक सोने खरेदीला येत आहेत. आलेल्या ग्राहकांना हमखास आकर्षक पैठणी मोफत भेटत आहे.

“ग्राहकांच्या प्रेमामुळेच प्रगतीचा आलेख उंचावला’
सध्याच्या काळात कोरोनाचे मोठे संकट आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये ग्राहकांचा फायदा समोर ठेवून “वजनदार जोडी’ ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांना सततच नाविन्यपूर्ण दागिने देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना चांगली सेवा देताना पैसे कमी मिळाले तरी चालतील पण ग्राहकांचे समाधान व फायदा होणे महत्त्वाचे असल्याने त्या दृष्टीने आम्ही सोन्या-चांदीचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत.

ग्राहकांच्या प्रेमामुळेच आमच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. यापुढील काळातही नवीन योजनेसह नाविन्यपूर्ण सोन्या चांदीचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती श्रीप्रथमेश ज्वेलर्सचे प्रा. लिमिटेडचे संचालक प्रथमेश जवळेकर यांनी दिली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.