फॅंड्री या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातला बॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. “पुणे टू गोवा’ चित्रपटातून राजेश्वरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून या अगोदर तिने फॅंड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून काम केले होते.
अमोल भगत दिग्दर्शित “पुणे टू गोवा’ या चित्रपटात राजेश्वरी बरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली असून हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ऍक्शन सिनेमाच्या चाहत्यांना आवडेल असा आहे.
वास्तविक हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणाऱ्या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत यांनी दिली.