Rajasthan Election Result 2023 : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान मोजणीला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला मतदारांनी पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून आता भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काँग्रेसला टोला लगावत दावा केला आहे की,”भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. जादुगराची जादू आता संपली आहे, त्यांचा ताईत तुटला आहे. राजस्थानच्या जनतेनं या निवडणुका काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी लढल्या होत्या” असे म्हणत त्यांनी काँग्रेस वर टीका केली आहे.
* सुरुवातीच्या कलांमध्ये काय हाती आले हे वाचा
त्यासोबतच राजस्थानचा मतदार हा खोट्या आश्वासनांना भुलणार नसून राजस्थानच नाही तर छत्तीसगडसह चारही राज्यात भाजपचा विजय होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
#WATCH | Union minister and BJP leader Gajendra Singh Shekhawat says, "BJP will win with a huge majority in Rajasthan. Jadugar ka jadoo khatam ho gaya hai. In MP, the BJP will form govt with a 2/3 majority. In Chhattisgarh, the party will form the govt." pic.twitter.com/G2kO36kHlu
— ANI (@ANI) December 3, 2023
दरम्यान, दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप ९९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पक्ष ७५ जागांवर आघाडीवर असून इतर पक्षांना १५ जागांवर आघाडी मिळताना दिसून येत आहे.
* ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत.