Chhattisgarh Assembly Election Result 2023 Live Updates : छत्तीसगडमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळत आहे. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. मात्र, ट्रेंडनुसार कधी काँग्रेस तर कधी भाजप आघाडीवर दिसत आहे.
ट्रेंडनुसार सध्या भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस पक्ष 42 जागांवर व इतर अपक्ष 1 जागांवर आघाडीवर दिसत आहे. ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार bjp ने आघाडीवर दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार भाजप 36 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 1 जागेवर आघाडीवर दिसत आहे. आतापर्यंत एकूण 67 जागांचे ट्रेंड आले आहेत.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, कोणाच्या दाव्यात किती तथ्य आहे हे आज कळेल. राज्यातील बहुतांश जागांवर दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा सरकार पुन्हा येईल, अशी काँग्रेसला आशा आहे, तर भाजपलाही पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे.
Chhattisgarh 2018 मध्ये विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेसने 68, भाजपने 15, बहुजन समाज पक्षाने दोन आणि पाच उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाले होते.