Telangana Election Result 2023: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह आता तेलंगणा विधानसभा निवडणूकचे निकाल देखील हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष बीआरएस पिछाडीवर जात असल्याचे दिसत आहे. आता मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत काँग्रेसला 53, BRS 30 तर भाजपला केवळ 6 जागांवर विजय मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत.
तेलंगणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने आघाडी घेताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम डीके शिवकुमार प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “जर पक्षाला 70 हून अधिक जागा जिंकण्यात यश आले, तर मुख्यमंत्रीपदावरून पक्षातील अंतर्गत कलह समोर येऊ शकतो. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षातील काही नेते असमाधानी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जिथे काँग्रेस 65 पेक्षा कमी जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनतो, तिथे मुख्यमंत्री ठरवणे कठीण जाते. कारण हे आव्हान मुख्यमंत्री होण्याची आशा असलेल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांनीच निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत हे सर्व नेते बीआरएसला (BRS) मदत करू शकतात.
#WATCH | Hyderabad, Telangana: Karnataka Deputy CM DK Shivakumar says, “…We are hoping that the people of Telangana have decided for a change. I am in a very positive mood. We will give a government with good governance…Some of our candidates have informed us that whoever… pic.twitter.com/rV2uz6gF90
— ANI (@ANI) December 2, 2023
पुढे शिवकुमार म्हणाले की, “मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विजयी उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्रिशंकू विधानसभा झाल्यास बीआरएस आमचे आमदार फोडू शकते. बीआरएस काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मंत्रीपद देऊ शकते.” दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार निवडणूक येणाऱ्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची आणि घोडेबाजार टाळण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे मतमोजणी सुरु होताच काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवारावर नजर ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव कामरेड्डी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी येथे आघाडीवर आहेत.