Rajasthan Assembly Election Result 2023: राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान मोजणीला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. फोनद्वारे अपक्षांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
आजच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा राजे यांनी मेहंदीपूर बालाजीला मोती डुंगरी गणेशजींना जाऊन पूजा करून गेली. तेव्हापासून त्यांची टीम रात्री उशिरापर्यंत सक्रिय असते. माजी मुख्यमंत्री अपक्ष आणि त्यांच्याच लोकांच्या संपर्कात आहेत. इतकंच नाही तर बनसूरमधून निवडणूक लढवत असलेले रोहित शर्मा यांनी, मॅडमने विचारलं तर मी त्यांच्या बाजूने मतदान करायला जाईन.” असे वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राजस्थानमध्ये आज निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात सुरुवातीचे कल समोर येताना दिसून येत आहेत. राज्यातील सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढाई असलयाचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हे प्राथमिक अंदाज आहेत. दुपारपर्यंत राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून,
पुढील पाच वर्षांसाठी जनतेने राज्याची धुरा कोणत्या पक्षाकडे सोपवली आहे, हे सर्वांसमोर,येणार आहे. राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. भाजप नेते राजस्थानमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहेत, तर राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेते राज्यात सरकारची पुनरावृत्ती करण्याविषयी विश्वास व्यक्त करताना दिसून येत आहेत.