वाराणसी : भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज कांशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचे मंदिराच्या विश्वस्तानी स्वागत केले.
तेथून त्यांनी सारनाथ येथील बौद्ध तीर्थ स्थळाला भेट दिली तसेच गौतम बुद्धांनी जिथे पहिले प्रवचन दिले त्या धामेक स्तुपालाही त्यांनी भेट दिली. राजपक्षे हे शुक्रवारपासून पाच दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.