काटेवाडी – श्री क्षेत्र कन्हेरी (ता. बारामती) येथील मारुती देवाची यात्रा मोठ्या उत्साहात परंपरेनुसार पार पडली. श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी येथे पहाटेपासून लाखो भाविकांनी श्री मारुतीरायांचे दर्शन घेतले. तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे चार वाजता मारुतीला अभिषेक करून यात्रेस सुरुवात झाली. सकाळपासूनच मंदिरामध्ये विविध पूजा, प्रवचन, कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. दुपारी साडेबारा वाजता छबिना मिरवणूक काढण्यात आली. पालखीमध्ये मारुती देवाची मूर्ती ठेवून गावातील ग्रामस्थांनी ही पालखी खांद्यावर घेऊन संपूर्ण गावातून वाजत गाजत ढोल पथक, लेझीम पथक व इतर वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक काढून पुन्हा मंदिरामध्ये आणण्यात आली.
यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. मारुती देवस्थानच्या आवारातील परिसरात विविध दुकानांनी यात्रा गजबजून गेली होती. कण्हेरी येथील मारुती देवस्थान हे पुरातन देवस्थान आहे. येथे श्रावणातील शेवटच्या शनिवारी राज्यासह परराज्यातील देखील भाविक दर्शनाला येत असतात.
श्री क्षेत्र कन्हेरी येथे लाखो भाविकांनी घेतले मारुतीरायांचे दर्शन; यात्रा उत्साहात संपन्न pic.twitter.com/Cj8SUsS8ab
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 9, 2023