राज ठाकरेंची मोठी पोलखोल ; हरिसाल डिजिटल जाहिरातीमधील मुलगा केला हजर

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी नांदेड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवनार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीवर सडकून टीका केली. हरीसाल डिजिटल गावाचं वास्तव आम्ही समोर आणल त्यावर मुख्यमंत्र्यांनी गाव डिजिटल झालंच आहे, असा दावा केला. पण सध्य स्थितीमध्ये या गावाची पोलखोल करत गावात ४ जी टॉवर नाही,एटीएम मशीन बंद आहेच शिवाय रोजच्या प्राथमिक गोष्टी देखील या गावात नसल्याचे राज ठाकरे यांनी पुन्हा व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणले.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीमधील लाभार्थी मॉडेल म्हणून ज्याने काम केले आहे, तोच सध्या रोजगाराच्या शोधात गाव सोडून निघून गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर या जाहिरातीमधील मॉडेल मुलगा राज ठाकरे यांनी स्टेजवर केला हजर केला.

एवढयावरच न थांबता राज ठाकरे यांनी अजून एक गौप्यस्फोट करत, हरिसाल डिजिटल गावाची जाहिरात पण हरिसाल या गावात शूट केली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही संपूर्ण जाहिरात मुंबई शहराच्या आसपास तयार केली असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे हरिसाल डिजिटल गावाविषयी बोलताना पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारत का खोटं बोलताय मुख्यमंत्री? असे राज ठाकरे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.