ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण करणे पडले महागात

लोणंद-  तरटीचा मळा पाडेगांव, ता. फलटण येथे ग्रामपंचायत शिपायाच्या डोक्‍यात दगड घालून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी संपत विष्णु अडसुळ (वय 68, रा. तरटीचा मळा, पाडेगाव) यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जाधव, फलटण यांनी सदर गुन्ह्यात दोषी धरुन सहा महिने कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली.

अधिक माहिती अशी की, 3 जुलै 2016 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास बाळासो मारुती अडसूळ (ग्रामपंचायत शिपाई) हे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा योजनेच्या नळाच्या पाण्याचा वॉल बंद करीत असताना पाण्याचा वॉल बंद का केला असे म्हणून आरोपी संपत विष्णू अडसूळ याने हातात दगड घेऊन बाळासो अडसूळ यांच्या डोक्‍यात पाठीमागे मारुन गंभीर दुखापत केली असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी संपत अडसुळ यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जाधव , फलटण यांनी सदर गुन्ह्यात दोषी धरुन सहा महिने कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली असून सदर केसमध्ये सहायक सरकारी अभियोक्ता सतिश नाईकवाडे व प्रॉसिक्‍युशन स्कॉडचे काम वैशाली नेवसे यांनी पाहिले. सदर गुन्ह्याचा दोषारोप दत्तात्रय पवार पोलिस नाईक यांनी तात्कालीन सपोनि संदिप भोसले व सपोनि गिरीश दिघावकर यांचे मार्गदर्शनाखाली दाखल केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.