राज ठाकरेंनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन

कार्ला – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. 5) सातव्या माळेच्या मुहुर्तावर लोणावळा येथील कार्ला निवासिनी एकवीरा देवीचे आपल्या परिवारासह दर्शन घेतले.

कोळी, आगरी लोकांची कुलस्वामीनी असलेली कार्ल्यांची एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदैवता आहे. नवरात्रीच्या काळामध्ये एकवीरा देवीच्या दर्शनाला येण्याची ठाकरे घराण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. कुठलेही शुभकार्य करण्याच्या अगोदर ठाकरे कुटुंबीय आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

याच परंपरेचे पालन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, मुलगी उर्वशी, सून मिताली यांनी सहकुंटुब एकवीरा देवीचे दर्शन घेतले. या वेळी मावळ मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, वडगाव नगरसेविका सायली म्हाळस्कर, अशोक कुटे, योगेश हुलावळे, भारत चिकणे, संतोष खराडे, जाज दास, नाथा पिंपळे, अनंता तिकोणे, सुनील सावळे, अविनाश जांभुळकर, विजय भानुसघरे, संतोष मोंधळे, अमित बोरकर, राज शेलार, दिनेश कालेकर, राजेश भोमे, अमित भोसले, सोमनाथ केदारी यांच्यासह मावळ मनसेचे पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.