पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दिवसभरात खडकवासला-3, पानशेत-21, वरसगाव-19 आणि टेमघर धरण क्षेत्रात 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. पण, रविवारी धरण क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. दि. 1 जूनपासून आजपर्यंत खडकवासला-212, पानशेत-436, वरसगाव-419 आणि टेमघरमध्ये 632 मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर, या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 5.67 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.