पावसाचा कलेढोणला दिलासा

ओढे, नाले अन्‌ बंधारेही तुडूंब

कलेढोण -विखळे परिसरात काल दुपारी 4 च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास दीड तास पडलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरले.

ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने शिवाराला नद्या-नाल्याचे स्वरूप आले होते. गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे अचानक येण्याने गावकऱ्यांची अक्षरशः धांदल उडाली. अनेक दिवस दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमललेलं दिसतंय.

एकंदरीतच इथला शेतकरी वर्ग सुखवल्याच चित्र पाहायला मिळाले. 2019 च्या वॉटर कप स्पर्धेत तसेच पाणलोट विकास समिती अंतर्गत केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे कलेढोण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी अडवलं गेलं असल्याने हा ढगफुटी सदृश पाऊस नक्कीच फायदेशीर ठरेल. पावसामुळे शेतकरी पेरण्या तरी करू शकतो अशी आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान, काल झालेल्या पावसामुळे सध्या तरी समाधानाचे वातावरण असले तरी मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.