आर्वीत आठ वर्षीय मुलाला झालेल्या मारहाणीचा निषेध

सातारा – आर्वी, जि. वर्धा येथील मातंग समाजातील आठ वर्षाच्या मुलाला गंभीर मारहाणीचा साताऱ्यात निषेध करण्यात आला. त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या उमेश उर्फ अमोल ढोरे यास कडक शिक्षा करण्याची मागणी निवेदनाव्दारे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सुरेश बोतालजी, अमर गायकवाड, उमेश खंडुझोडे, भगवान अवघडे, सतीश बाबर, कांतीलाल कांबळे आदी उपस्थित होते.

आर्यन गजानन खडसे हा आठ वर्षाचा मुलगा वस्तीतील जोगणा मंदिरात खेळायला गेला होता. मात्र याच परिसरात राहणाऱ्या आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे याने लहान मुलावर चोरीचा खोटा आरोप केला. तसेच त्यास अमानवीय, अत्याचार, अमानुष मारहाण करून त्याची पॅन्ट काढून रखरखत्या उन्हात गरम झालेल्या स्टाईलवर बसवून मागील बाजूस गंभीर इजा केली.

हा प्रकार निंदनीय असून अशा विकृत कृत्याबद्दल आरोपीस जास्तीत जास्त कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील मातंग समाज बांधवाची आहे. समाजबांधव अशा विकृत कृत्याचा जाहीर निषेध करीत असून आर्यन गजानन खडसे यास योग्य न्याय न मिळाल्यास सातारा जिल्ह्यात पुढील काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.