पुणे – कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. तर हेमंत रासणे हे पिछाडीवर आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी कांटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोळाव्या फेरीमध्ये धंगेकर यांनी तब्बल 6006 मतांनी आघाडी घेतली आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले,’भाजपा, शिंदेगटाकडून पैशांचा पाऊस, मात्र विजय महाविकास आघाडीचा होईल.’ असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे
भाजपा, शिंदेगटाकडून पैशांचा पाऊस, मात्र विजय महाविकास आघाडीचा – रोहीत पवार
Posted by Digital Prabhat on Wednesday, 1 March 2023