नवी दिल्ली : कर्नाटकची राजधानी बंगळुरूसह अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरूतील पावसामुळे तर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी लोक अडकले होते.
बंगळुरूमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. ANI या वृत्तसंस्थेने आपत्तीग्रस्त भागांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत ज्यात रस्त्यावर पडलेली झाडे दिसतात. काही झाडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरही पडल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
#WATCH | Karnataka: Trees uprooted in several localities of Bengaluru after heavy rain lashed the city.
(Earlier visuals from Malleshwaram) pic.twitter.com/IxAMZi5qjI
— ANI (@ANI) May 21, 2023
रविवारी दुपारी बंगळुरूमध्ये अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस पडला, यादरम्यान अनेक ठिकाणाहून गारपिटीच्या बातम्या आल्या आहेत.
शहरात अजूनही पाऊस पडत आहे, त्याचा वेग कमी झाला असला तरी पाऊस या दरम्यान जोरदार वारा वाहू लागला हवामान खात्याने याआधीच येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.